नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
दिनांक 18 9 2025 रोजी हिरकणी महिला ग्रामसंघ 5वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सावितीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोचे पूजन दीपप्रज्वलन करून मा. सहा.गट विकास अधिकारी संजय झंझाड गावातील सरपंच निवृत्ती केशरखाने महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख गलफट साहेब, उमेद अभियानाच्या तालुका व्यवस्थापक मा. सविता बहादूरे मॅडम,घरकुल विभागाचे अळने साहेब,पर्यवेक्षिका लोथे मॅडम,SBI बँक शाखा व्यवस्थापक पंकज समर्थ, वेलकम इंडस्ट्री चे संचालक मंगेश जामाणिक दिशा संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्या प्राची मॅडम,तेजस्विनी तायडे HDFC बँकेतील शाखा व्यवस्थापक ठाकरे साहेब, बेलनकर साहेब,हिरकणी ग्रामसंघे पदाधिकारी या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून केली.सर्व मान्यवरणं यांचे स्वागत करण्यात आले.सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन उमेद अभियानातील तालुका व्यवस्थापक सविता बहादूरे यांनी केले, मागिलं वर्षाचे अंदाजपत्रकाचे वाचन ग्रामसंघाच्या लिपिका पूनम बागडे यांनी केले VRF,CIF निधी ची माहिती दिली,ग्रामसंघाचे पुढील नियोजन करण्यात आले.ग्रामसंघ पदाधिकारी फेर निवड करण्याची चर्चा केली परतू हेच पदाधिकारी कायम ठेवण्याचा ठराव निर्णय घेवून सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. सहा.गटविकास अधिकारी यांनी महिलाना उद्देशून उद्योग व्यवसाय करावे, आपल्या जिल्हा प्रदर्शन, विभागीय प्रदर्शनी मध्ये आपल्या महिला बचत गटाचे स्टॉल असतात तर आपल्या समूहातील वस्तू विक्रीस आपण ठेवु शकतो अशी माहिती साहेबांनी दिली व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या HDFC बँकेतील शाखा व्यवस्थापक ठाकरे व SBI बँकेतील शाखा व्यवस्थापक पंकज समर्थ सर यांनी बकेतील कर्ज घेण्यासंदर्भात समूहातील महिलाना माहिती दिली, विमे काढणे का आवश्यक आहे,PMJJY,PMSBY विषयीची माहिती दिली.मंगेश जामनीक साहेब यांनी पैशाचे झाडे कस लावावे, मार्केटिंग विषयीची माहिती, व्यवसाय का महत्वाचा आहे PMFME प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजने संदर्भात चांगल्या प्रकारे माहितीदीली, अमरावती येथील दिशा संस्था येथील तेजस्विंनी यांनी महिला अत्याचार विषयी सखोल मार्गदर्शन केले महिलाना सोप्या शब्दात समजेल अशा प्रकारे वेगवेळ्या कलमांची माहिती उदाहरणे देऊन माहिती दिली गलफट साहेब यांनी सही पोषण देश रोशन या विषयावर मार्गदर्शन केले, व बाल संगोपन,मातृत्व जनकल्याण योजना या विषयी माहिती दिली,तसेच जी. परिषद शाळेतील मुख्याध्यापक यांनी महिला बचत गटातील महिलांचे , नियोजनाविषयी कौतुक केले व मार्गदर्शन केल.महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी नाटिका, नृत्य स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,पाककला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले व सर्वांना बक्षीस सुध्दा देण्यात आले,शिरपूर पारधी बेड्यावरील सकिना पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामधून पारधी समाजाची व्यथा मांडली त्या मधून आज समूहाच्या माध्यमातून आम्ही पुढे आलो व समजून घेऊन आम्ही सुद्धा बँक कर्ज घेऊन व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात आहोत असे छान मनोगत त्यांनी व्यक्त केले सरपंच साहेब निवृत्ती केशरखाने ग्रामसंघ अध्यक्ष राजश्री माकोडे, उपाध्यक्ष सुनीता ज्ञानेश्वर केशरखाने सचिव आरती मधुकर सोनवणे यांनी केले.
