एस.टी.बस अभावी, विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान
चादुर रेल्वे येनस नांदगाव खंडेश्वर सरळ बसचा अभाव.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी उपरोक्त वेळेत राज्य परिवहन (एस.टी) ची बस उपलब्ध नसल्याने राजुरा .बोरी .वाई .येनस. अनेक गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या काळात शेतकरी शेतमजूर भूमीहीन मजुर सर्वांचे पाल्य विद्यालयीन .महाविद्यालयीन. शिक्षण घेणे करिता शहरात जात आहे मात्र विद्यार्थ्यांना शाळा किंवा शिकवणी च्या वेळेत राजुरा परिसरातून येणस मार्गे सकाळी सहा साडेसहा वाजता नांदगाव खंडेश्वरला जाण्याकरिता बस उपलब्ध नाही तसेच सायंकाळी पाच वाजता नांदगाव वरून येनस राजुरा टोगलाबाद.बस नसल्याने विद्यार्थांना खाजगी वाहनाने यावे लागते. कझरा मार्गे नांदगाव वरून येणारी बस गच्च प्रवाशांनी भरलेली असतात करिता गैरसोय होत असल्याने

राजुरा परिसरातील शेकडो विद्यार्थ्यां करिता एस .टी .प्रशासनाने तातडीने बस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास जबाबदारी कुणाची ?

बस अभावी राजुरा येथील शेकडो विद्यार्थी ऑटोरिक्षा वाहनाने धोकादायक प्रवास करीत आहे बस नसल्याने अनेक चिमुकले विद्यार्थी ऑटो रिक्षाने सकाळी पहाटेच निघतात .खाजगी प्रवाशात अघटीत घडल्यास जबाबदारी घेणार कोण असा सवाल शिंदे सेनेचे युवा प्रमुख धामणगाव विधानसभा.मा. राहुल हजारे सह शुभम यावलकर. हेमंत बावनकुळे. संकेत गिरटकर. मुन्ना मेश्राम . गणेश शेबे. वैभव शेंडे . समीर देशमुख. आदित्य कारमोरे.सौ.रेणुका रघुते.यांनी उपस्थित केला आहे.
