खंडेश्वर मंदिर व येनस परिसरात केले श्रमदान
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांना देशभरात प्रारंभ करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव खंडेश्वर (आयटीआय) तर्फे बुधवारी (ता. 17) स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्रमदानाचे आयोजन प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.शहरातील खंडेश्वर मंदिर व येनस परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात संस्थेचे प्रशिक्षणार्थी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परिसरातील कचरा, गवत व प्लास्टिक गोळा करून स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसराला स्वच्छ व देखणे ठेवण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन समाजात स्वच्छतेचा संदेश पोहोचला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आयटीआयचे शिल्पनिदेशक राजेंद्र उन्होंणे, राजकुमार धोटे, तुषार जैन, प्रफुल्ल कचरे, वैभव जाधव, निलेश देऊळकर, राम इखार, शहजाद खान, सुशिल सरोदे, सागर डांगे, चिन्मय दहाट, वैभव केणे, प्रशांत पोच्ची, सचिन वाहणे, सचिन दुवदने, मयुरी वसुले, रूचिका डोरस, संगिता बिबेकर, दिपाली लोखंडे, रूपाली लांडे, सुरक्षारक्षक धिरज तायडे यांच्यासह प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रम घेतले.
