अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी तालुक्यामधील निर्मला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कापुसतळणी येथे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५ अंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुकास्तरीय विज्ञान नाटीका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य फादर जोसेफ आय. तवामणी यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. गोपाल डालके सर (उपप्राचार्य), मिलींद तायडे सर (अध्यक्ष, अंजनगाव तालुका विज्ञान अध्यापक मंडळ), संजय शेळके सर (सचिव), सुनिल लव्हाळे (मुख्याध्यापक, सर्वोदय विद्यालय कोकर्डा), ओम इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर सायन्स कॉलेजचे प्रा. निलेश आर. गोमाशे (सदस्य, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुणे), राहुल इंगळे सर, शितल सरदार (तायडे मॅडम), संजय कुजूर सर, सौ. भाग्यश्री देशपांडे मॅडम, सौ. कार्तिकी संगई, श्रीमती मिनाक्षी खेडकर, श्री. आशिष अस्वार, कु. किरण भास्कर, सनाउल्ला खान उर्दु गल्स हायस्कुल व डॉ. सुफी उर्दु ज्यु. कॉलेज अंजनगाव सुर्जी चे शिक्षक हे उपस्थित होते.या नाट्यस्पर्धेमध्ये विज्ञानावर आधारीत नाटीका सादर करण्यात आल्या. या विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेकरीता एकूण पाच विषय दिलेले होते. विज्ञानातील महिला, स्मार्ट शेती (नाविण्यपूर्ण), डिजीटल भारत जीवन सक्षमीकरण, सर्वांसाठी स्वच्छता, हरित तंत्रज्ञान या नाट्यस्पर्धेमध्ये निर्मला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कापुसतळणीने सादर केलेली ‘स्मार्ट शेती (नाविण्यपूर्ण)’ या नाटीकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या नाटीकेचे लेखक श्री. गोपाल डालके सर व दिग्दर्शिका शितल सरदार (तायडे मॅडम) ह्या होत्या. या नाटीकेमधील विठोबाच्या भूमिकेत अर्णव सरदार, रुखुमाईच्या भूमिकेत कु. अपेक्षा वानखडे, निवेदक शंतनु इंगळे, समुपदेशक १. प्रियांशु डोंगरदिवे, समुपदेशक २ कु. धनश्री सरदार, श्याम्याच्या भूमिकेत पार्थ मोरे, सोनीच्या भूमिकेत शितल बावणे, तर स्मार्ट शेतीच्या भूमिकेत कु. प्राची रताळे, या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेतकऱ्यांच्या जीवनातील हाल अपेष्टा कष्ट व दुःख बघून उपस्थितांचे डोळे पाणावले. या शेतकरी जीवनावर व स्मार्ट शेतीवर आधारीत उत्कृष्ट विज्ञान नाटीकेला प्रथम क्रमांक देण्यात आला. व सीताबाई संगई विद्यालय (मुले) अंजनगाव सुर्जी यांनी देखील ‘स्मार्ट शेती (नाविण्यपूर्ण)’ सादर केलेल्या विज्ञानावर आधारीत या नाटीकेला द्वितीय क्रमांक देण्यात आला. तर सीताबाई संगई कन्या विद्यालय, अंजनगाव सुर्जी यांनी देखील ‘दृष्टी बदला, सृष्टी बदलेल’ ही नाटीका सादर केली. या अंधश्रध्देवर आधारीत नाटीकेला तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच सनाउल्ला खान उर्दु गल्स हायस्कुल व डॉ. सुफी उर्दु ज्यु. कॉलेज अंजनगाव सुर्जी यांनी सादर केलेल्या ‘सर्वांसाठी स्वच्छता’ स्वच्छतेवर आधारीत नाटीकेला चतुर्थ क्रमांक देण्यात आला. सर्वच नाटीकेचे सादरीकरण उत्कृष्टपणे करण्यात आले.या नाट्य स्पर्धेला परिक्षक म्हणून सचिव अंजनगाव तालुका मुख्याध्यापक संघ श्री. सुनिल मारोतराव लव्हाळे (मुख्याध्यापक, सर्वोदय विद्यालय कोकर्डा), ओम इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर सायन्स कॉलेजचे प्रा. निलेश आर. गोमाशे (सदस्य, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुणे) हे लाभले.या नाट्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता अंजनगाव तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, निर्मला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कापुसतळणी, सनाउल्ला खान उर्दु गल्स हायस्कुल व डॉ. सुफी उर्दु ज्यु. कॉलेज अंजनगाव सुर्जी, सीताबाई संगई कन्या विद्यालय, अंजनगाव सुर्जी, सीताबाई संगई विद्यालय (मुले) अंजनगाव सुर्जी च्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलीत.
