- संचालक मंडळ व सभासदांची उपस्थिती
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
१४ सप्टेबर रोजी एकवीरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अंजनगाव सुर्जी र. नं. ४८४ जि. अमरावती या संस्थेची बत्तीस वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मधुसुदन गुजर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेचे मुख्य कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे पार पडली.संस्थेच्या आमसभेला सुरुवात सरव्यवस्थापक यांनी केली. तत्पूर्वी संस्थेच्यावतीने आमसभेमध्ये विषयसूचीचे व संस्थेच्या अहवालाचे वाचन सरव्यवस्थापक नितीन बंड यांनी केले. संस्थेचे वसूल भागभांडवल, स्वनिधी, कर्जवाटप क्षमता,कर्जवसुली, ठेवी यांचा वाढता आलेख सभेमध्ये मांडण्यात आला. संस्थेची कमी झालेली थकबाकी तसेच कर्जदार सभासदांना नियमित कर्ज भरणा करण्याबाबत विनंती करण्यात आली. संस्थेच्या सभासदांचा संस्थेवर दृढ विश्वास असल्यामुळे संस्थेला प्रगती करणे शक्य झाले असे मत संचालक मंडळाने व्यक्त केले. संस्थेच्याप्रती सभासदांचा असलेला विश्वास याबद्दल सर्व सभासदांचे आभार संचालक डॉ. प्रमोद येऊल यांनी व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर मधुसुदन गुजर अध्यक्ष, विजय जयस्वाल उपाध्यक्ष व संचालक मनोहर मुरकुटे, दिलीप धोटे, प्रकाश अकर्ते, किशोर बोरोडे, डॉ. प्रमोद येऊल, अॅड. पद्दमाकर सांगोळे, सौ. उषाताई गुजर, सौ. बबिताताई पोटदुखे तसेच बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
