नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी होणाऱ्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोवंशीय पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३३ जनावरे व अंदाजे १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.शनिवारी (दि. १३ सप्टेंबर २०२५) रोजी पो. उपनिरीक्षक विशाल रांकडे हे त्यांच्या पथकासह नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार समृद्धी टोलनाक्याकडून शिवणीमार्गे नांदगाव खंडेश्वर येथे जाणाऱ्या एका दहा चाकी ट्रक (क्रमांक MH-…) मध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याचे समजले.

ही माहिती मिळताच पोलीस पथकाने ग्राम शिवणीजवळ नाकाबंदी केली. संशयित ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलीसांनी शिताफीने कारवाई करून त्यांना पकडले.

अटक आरोपींची नावे झनकलाल हरदयसिंग मारकाम (वय ३६, रा. नारी रोड, नालंदा, नागपूर,गुलाम रसुल मोहम्मद अली नदी (वय ३९, रा. टेका नाका, नागपूर, मोहम्मद अली विकाधत अली (वय ३२, रा. कामठी, नागपूर)तपासणीदरम्यान ट्रकमध्ये एकूण ३३ गोवंशीय जनावरे आढळून आली. जनावरांची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असून, ट्रकची किंमत १० लाख रुपये आहे. अशाप्रकारे सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त जनावरे व वाहन नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.पोलिस निरीक्षक श्रीराम लांबडे कारवाई करीत आहेत मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो. उपनिरीक्षक विशाल रांकडे, पोलीस अंमलदार संतोष तेलंग, दिपक पाल, राजेश कासोटे, दिपक पाटील, मारोती वैद्य व चालक किशोर सुने,स फौ गणेश खंडारे,स फौ चालक प्रमोद मनवर,पोहेका प्रशांत पोकळे,पोका निखिल मेटे,पोका सूर्यकांत केंद्रे ,पोका नितेश पवार यांनी सहभाग नोंदवला.
