अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील ओम इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज मध्ये एकदिवसीय स्वच्छता अभियानाची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन ओम चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष मा श्री दिनेशजी भोंडे तर प्रमुख अतिथी म्हणून सौ वैशालीताई दिनेशजी भोंडे, श्री राजेशजी बोडखे, डॉ राजेशजी धुर्डे, डॉ पुजाताई राजेशजी धुर्डे, कोषाध्यक्ष श्री जीतेंद्रजी कटारमल, सौ सोनलताई जीतेंद्रजी कटारमल, प्राचार्य डॉ पुजाताई हनवंते, श्री प्रफुल्लजी गायकवाड, कु राजेश्वरी मेटकर हे उपस्थित होते. एकदिवसीय स्वच्छता अभियान कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथींनी उपस्थित विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व्न पटवून दिले. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कचरा गोळा करताना आपण ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा, सॅनिटरी कचरा अशाप्रकारे कचरा वर्गीकृत करावा याचे ज्ञान दिले. कचरा गोळा करताना व कचरा गाडीला देताना केवळ आपल्या शहराच्या संकलन प्रणालीला कचरा द्या, आपल्या घरातील ओला कचरा आणि सुका कचरा न चुकता वेगळा ठेवा, कचरा रस्त्यावर फेकू नका किंवा जाळू नका, मित्रांना व कुटुंबियांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व समजावून सांगा, व आपल्या वर्गमित्रांसोबत स्वच्छता क्लब सुरू करा. आपल्याला स्वच्छतेच्या नियमांचे ज्ञान असणे हेच निरोगी जीवनाचे वरदान असते. या एकदिवसीय स्वच्छता अभियान कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रमुख व विद्यार्थीनी प्रमुख तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतलीत.
