निर्मिती पब्लिक स्कूल तर्फे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे “पूर्णा माय स्वच्छ अभियान” मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. गणपती विसर्जनानंतर पूर्णा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नदीकाठावर मूर्ती अवशेष व फुलांचा कचरा मोठ्या प्रमाणात विखुरलेला होता. या स्थितीकडे पाहून शाळेने एक नवा संकल्प केला – “निसर्गाचे रक्षण, पर्यावरणाचे संवर्धन”
ही संकल्पना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री भास्कर दादा टोम्पे यांच्या प्रेरणेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक तुषार खोंड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नदीकाठ पूर्णपणे स्वच्छ करून एक सुंदर व स्वच्छतेचा संदेश दिला.
स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हात घालून काम केले. त्यांना क्रीडा शिक्षक सुयोग गोरले , शिवानी तेलखडे, साक्षी सपकाळ, वर्षा अढाऊ, सुमित राऊतकर, नामदेव उईके, वैभव तायडे, अनुप ठाकरे, व शिक्षकांनी पर्यावरण संवर्धन, जबाबदारीची जाणीव आणि समाजसेवेचे महत्त्व याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण झाली. तसेच स्वच्छता राखणे ही केवळ शासकीय जबाबदारी नसून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे हा संदेश संपूर्ण तालुक्यात आणि राज्यात पोहोचविण्यात आला.निर्मिती पब्लिक स्कूल नेहमीच अशा उपक्रमांद्वारे समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते. शाळेचा ब्रीदवाक्याप्रमाणे – “माझी शाळा – सुंदर शाळा, माझा समाज – स्वच्छ समाज हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पसरला.