अंजनगाव सुर्जी/ / मनोहर मुरकुटे
अंजनगाव व सुर्जी येथील गणपती विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली.या मिरवणूकीची सुरवात अंजनगाव शहरातील मुख्य ठिकाण पान अटाई येथून झाली तर सुर्जी येथील मिरवणुकीची सुरवात मोठी मळी येथून करण्यात आली.मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी अंजनगाव सुर्जी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तसेच अतिसंवेदनशील भागातील आवागमन असणारा मार्ग पूर्णतः बंद करुन त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली.६ सप्टेंबर व ७ सप्टेंबर रोजी दुपारपासून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली.ही मिरवणूक पान अटाई येथून मोमीनपूरा,ढोमनपूरा, संत गुणवंत बाबा चौक,संगत संस्थान, तेलीपूरा,सावकारपूरा,सराफा लाईन, चावडी चौक,शनिवार पेठ,पान अटाई मार्गे विठ्ठल मंदिर येत पर्यंत काढण्यात आली होती.मिरवणुकीची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत असून शहरातील ३९ गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.शांततेच्या मार्गाने मिरवणुक ही अतिसंवेदशील भाग असलेल्या मोमीनपूरा मशिद येथून काढण्यात आली.दरम्यान या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करुन मिरवणुकीला गालबोट लागणार नाही याची दक्षता नुकतेच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे,ठाणेदार सुरज बोंडे व सहकारी अधिकाऱ्यांनी घेतल्यागेली.नियमांचे उल्लंघन न होता गणपती विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली मिरवणुकीत ढोल ताशे,बँड पथक,डीजे साऊंड,दिंडी पथक, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा जिल्हाभरातून अतिरिक्त कुमक बोलवून संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही यावर उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष ठाकरे,पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी मिरवणुकीवर नजर ठेवली होती. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मिरवणुक पार पडली.
