अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय अंजनगाव सुर्जी मार्फत आत्मा अंतर्गत कीसान गोष्टी चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस संत्रा व केळी पीक व्यवस्थापन या विषयी शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. निलेश घोडेराव होते .तर प्रमुख पाहुणे जिल्हास्तरीय आत्मा समिती अध्यक्ष श्री. नरेंद्र काका शिंगणे, जिल्हास्तरीय आत्मा समिती सदस्य श्री. प्रदीपभाऊ येवले व श्री . प्रफुल सातव उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर, होते कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.गजाननभाऊ लवटे , आमदार दर्यापूर-अंजनगाव मतदार संघ तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.दिनेश पैठणकर, उद्यान विद्यातज्ञ डॉ.श्री. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ.श्री.उज्वल राऊत, केळी तज्ञ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प फळे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय अकोला , डॉ.श्री. योगेश इंगळे वनस्पती रोग तज्ञ डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व डॉ.श्री महल्ले , विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र , दुर्गापूर होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु. भारती जाधव तालुका कुषि अधिकारी अंजनगाव यांनी केले.तर डॉ. पैठणकर यांनी आंबीया व मुगबार नियोजन, ओलीत व तण व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले तर डॉ. इंगळे यांनी बुरशीजन्य फळगळ ,डिंक्या रोग व केळी रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले . डॉ. राऊत यांनी केळी अन्नद्रव्य व ओलीत व्यवस्थापन विषयी उपस्थित शेतकऱ्यांना सघोल मार्गदर्शन केले. तर डॉ. महल्ले यांनी केळी काढणी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित चित्रकार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धीरज वानखेडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांनी परिश्रम घेतले, सदर कार्यक्रमास तालुक्यातील संत्रा व केळी उत्पादक शेतकरी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
