मोर्शी / संजय गारपवार
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ जोगी जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ जुनेद यांचे मार्गदर्शनाखाली डेंगू जनजागृती पर कार्यक्रम शिवाजी उच्च माध्यमिक हायस्कूल येथे घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थी तसेच शिक्षकांना डेंगू आजाराबाबत माहिती देण्यात आली यामध्ये आजार होऊ नये म्हणून करावयाच्या प्रतिबंधक उपाययोजना सांगण्यात आल्या.यामध्ये 1) घराभोवती साचलेले पाणी व तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे 2) साचलेल्या पाण्यामध्ये तेल, वंगण, गाडीचे जळलेले ऑइल टाकने 3) घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस घासून पुसून कोरडे करणे 4) डासापासून स्वतःचे संरक्षण करण्याकरता रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा 5) संडासच्या गॅस पाईपला जाळी बसवावी 6) ताप आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे. इत्यादी उपायोजना केल्यास डेंगू आजाराबाबत प्रतिबंध होऊन आजार नियंत्रण करण्यासाठी मदत होईल अशा प्रकारची माहिती प्रशांत बेहेरे यांनी दिली.याप्रसंगी मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख ,उपमुख्याध्यापक मिलिंद ढाकुलकर,उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील कर्मचारी श्री विनय शेलुरे, श्री प्रकाश मंगळे, श्री प्रशांत बेहरे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सजग राहण्याच्या दृष्टीनेशपथ सुद्धा देण्यात आली. विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख उपमुख्याध्यापक मिलिंद ढाकुलकर यांनी आरोग्य विभागाचे आभार मानले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अर्चना तराळ यांनी केले.
