अंजनगाव सुर्जी/ मनोहर मुरकुटे
ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयासमोर आज सकाळपासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे व प्रकाश टाक यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.ओबीसी समाजाचे हक्क अबाधित राहावे यासाठी ओबीसी नेते माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने हे आंदोलन छेडण्यात आले असून यात विविध संघटना,युवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी
आंदोलनकर्त्यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा दिनांक २ सप्टेंबर चा ओबीसी विरोधी कलम कसाई शासन निर्णय रद्द करा ही प्रमुख मागणी घेवून आंदोलनाची सुरवात केली.शासनाच्या भूमिकेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने ओबीसी समाजात प्रचंड असंतोष आहे.”ओबीसींच्या हक्कांवर कुणी गदा आणली तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,”असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक तहसील कार्यालयासमोर जमले होते.आंदोलनकर्त्यांनी गळ्यात ओबीसीचा पिवळा दुपटा,डोक्यात पिवळी टोपी, बॅनरबाजी करुन घोषणाबाजी केली.तहसीलदारांना निवेदन देऊन मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली.आमची मागणी तात्काळ मान्य न झाल्यास पुढील काळात जिल्हास्तरीय तीव्र आंदोलन छेडले जाईल,”असा इशारा नेत्यांनी दिला आहे.यावेळी उपोषणस्थळी चंद्रशेखर देशमुख,विलास हाडोळे,नितीन काळे अक्षय हाडोळे,गजानन नायडकर, विनोद देशमुख,सुरज पवार,राजेन्द्र ठाकरे,दिपक येवकार,सुरेन्द्र वाघमारे,इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
