अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील ओम इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओम चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिनेशजी भोंडे हे होते तर प्रमुख अतिथी सौ वैशालीताई दिनेशजी भोंडे, श्री राजेशजी बोडखे, डॉ राजेशजी धुर्डे, डॉ पुजाताई राजेशजी धुर्डे, कोषाध्यक्ष श्री जीतेंद्रजी कटारमल, सौ सोनलताई जीतेंद्रजी कटारमल, प्राचार्य डॉ पुजाताई हनवंते प्रा डॉ कुणाल देशमुख, प्रा आदित्य ब्राम्हणकर, प्रा वैभव साखरे, प्रा पंकज बानाईत, प्रा सौ वैशालीताई ताडे, प्रा निलेशजी गामाशे हे उपस्थित होते. या प्रसंगी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी शिक्षकांचे स्वयंशासित विद्यालयाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता नववी व अकरावी मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. या स्वयंशासित विद्यालयाचे प्राचार्य कु. वेदिका ठाकरे, तर उपप्राचार्य कु. वेदिका पांडे यांनी उत्कृष्ट पणे कार्यभार सांभाळला. स्वयंशासित विद्यालयालायामध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रथम क्रमाक कु. वैष्णवी कासदेकर, द्वितीय क्रमाक राम चोपकार, तृतीय क्रमाक कु. समृद्धी काळे व प्रोत्साहन पर बक्षीस आदर्श रायबोले यांना देण्यात आले. सर्व विद्यार्थी शिक्षकांचा देखील पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. ओम इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर टीचर डे अक्षर तयार करून सर्व शिक्षकांना मानवंदना दिली.

प्रमुख अतिथींनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले व शिक्षकाचे आपल्या जीवनामधील महत्त्व पटवून दिले. गुरू ब्रम्हा, गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वर:। गुरू: साक्षात परब्रम्ह तस्मै: श्री गुरूवे: नम:। शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, आपला सर्वांगीन विकास व्हावा याकरीता अविरत प्रयत्न करतात, आपल्या जीवनाला ख-या अर्थाने आकार देण्याचे काम शिक्षक करतात. म्हणूनच शिक्षकांना समाजाचा शिल्पकार असे म्हटल्या जाते. इंजिनिअर, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी असे घडवण्याचे काम शिक्षक महत प्रयासाने करत असतात. शिक्षकांना खरच अतिशय महत्त्व असते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पुजाताई हनवंते, संचलन कु अक्षदा नाथे व कु सिद्धी बोबडे तर आभार प्रदर्शन कु संचिता गोटे यांनी केले. मार्गदर्शक शिक्षिका कु रेश्मा डोंगरे व कु पुजा धर्मे, कु. निशा वानखडे, कु. अपेक्षा उंबरकर , सौ माधुरी सिनकर यांनी विशेष परिश्रम घेतलीत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलीत.
