अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले.यामध्ये आर्चरी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तरवारबाजी, ज्युडो, कबड्डी, कराटे, खो-खो, किकबॉक्सिंग , लॉन टेनिस, मल्लखांब, नेहरू हॉकी नेटबॉल, रायफल शूटिंग, रोलबॉल, रोलर स्केटिंग, स्कवॅश, सुब्रतो मुखर्जी फुटबॉल, जलतरण तायक्वांदो , थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती फ्रीस्टाईल, कुस्ती ग्रीकोरोमन,वुशू, योगासन अशा प्रकारे विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.ओम इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उदघाटन ओम चॅरिटेबल फॉउंडेशन चे अध्यक्ष मा. श्री दिनेशजी भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सौ वैशालीताई दिनेशजी भोंडे, श्री राजेशजी बोडखे, डॉ राजेशजी धुर्डे, डॉ पुजाताई राजेशजी धुर्डे, कोषाध्यक्ष श्री जीतेंद्रजी कटारमल, सौ सोनलताई जीतेंद्रजी कटारमल, प्राचार्य डॉ पुजाताई हनवंते. तालुका क्रिडासंयोजक विशाल भेलांडे, शारीरिक शिक्षण शिक्षक तालुका अध्यक्ष सुनील चोपडे, शारीरिक शिक्षक हेमंत माकोडे हे उपस्थित होते तर क्रिडा शिक्षक समाधान शेटफलकर, कार्तिकेश चंदनपत्री, आयोजक श्रीकृष्ण धारपवार , उत्तमराव सोनटक्के, स्वप्नील रीथपुरकर, संजय काळमेघ, महेश अलोने, सुनील कालाने, प्रमोद मोरे, श्रीमती लोणकर मॅडम, सतीश रक्षे, इरफान सर परीक्षित चिकटे, नाझीर सर, इताल सर यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रमुख अतिथींनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.मानवी जीवनामध्ये खेळ व क्रिडा यांना अतिशय महत्व असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याकरीता प्रत्येक विद्यार्थ्याने विविध खेळ व क्रिडा स्पर्धेमध्ये सहभागी होणे अतिशय आवश्यक असते.क्रिडा स्पर्धेच्या उदघाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पूजाताई हनवंते, संचलन श्रीमती वंदनाताई उभाड तर आभार प्रदर्शन क्रिडाशिक्षक श्रीकृष्ण धारपवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
