अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 9 सप्टेंबर 2025 ला दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाप्रमुख श्री सुनील केणे व अखिल भारतीय शिक्षक संघाचे किरण पाटील सर यांनी अमरावती जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणारे जिल्हा परिषद कार्यालया समोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या 22 दिवसापासून बेमुदत बेमुदत बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शिक्षक संघटनांनी कंबर कसली आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ यां नेत्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे तसेच शासनाला आव्हान केले आहे कि या सर्व कर्मचाऱ्यांना गेली दहा दहा पंधरा पंधरा वर्षे झाले ते आरोग्य सेवेत प्रामाणिकपणे महिला व पुरुष सेवा देत आहे.

ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य चे माजि मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना न्याय दिला त्याच पद्धतीने आरोग्य सेवेतील महिला व पुरुषांना न्याय देण्यात यावा त्या साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अजित दादा पवार साहेब यांनी त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांचे आंदोलन व उपोषण सोडवावे अशी विनंती सुद्धा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाप्रमुख श्री सुनील केने व श्री किरण पाटील यांनी शासनाला केली या प्रसंगी त्या ठिकाणी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक रमेशजी सौंदळे हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवितो अशे आश्वासन दिले तसेच याप्रसंगी श्री सुनील केणे, किरण पाटील,श्री सुभाष सहारे, श्री मनोज चौरपगार दैनिक सकाळचे पत्रकार श्री सुधीर भारती Ndटीव्ही चे पत्रकार शुभम भायस्कर ज्या कंत्राटी महिलांनी जिल्हा परिषद चा परिसर कंत्राटी आरोग्य सेवकांच्या मगणिनी हा परिसर दणाणून सोडला होता अशा मोनाली खांडेकर,श्री कोठारी तसैच हजारो आरोग्य सेवकांची याप्रसंगी या बेमुदत उपोषणाला उपस्थिती होती.
