अत्यंत उत्साहात करण्यात आले विसर्जन
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
टाळ, मृदुंगाच्या गजरात माहुलीच्या राजाचे विसर्जन. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर यथे माहुलीचा राजा मंडळाच्या वतीने टाळ,मृदुंगाच्या गजरात तर शिवभोले मंडळाच्या वतीने ढोलताशे चे गजरात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन करण्यात आले. गावातील बहुतांश तरुणांचा सहभाग असलेल्या माहुलीचा राजा गणेशोत्सव मंडळ येथील पुंडलिक महाराज मंदिराचे प्रांगणात गणेशस्थापणा करून गणेशोत्सव साजरा करतात. मंडळ गणेशोत्सवा सोबत वर्षभर ईतर सामाजिक कार्यात अग्रेसर असते.

ज्यामध्ये ग्राम स्वच्छता, गरजु व्यक्तीला रक्तदान या मध्ये मंडळाचे कार्यकर्ते सक्रीय असतात. या वर्षी गणेशोत्सवा चे निमीत्ताने मंडळाचे वतीने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .

यात सामाजिक चित्रपटाचे प्रदर्शन,वृक्षारोपण,रक्तदान शिबीर,’भारताचा गौरवशाली ईतिहास” या विषयावर पंजाबराव आव्हाळे (अकोला) यांचे व्याख्यान, लहान मुलांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा या करीता स्पर्धात्मक खेळ व सांसकृतीक कार्यक्रम,महाआरती चे आयोजन करण्यात आले.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. व रविवारला टाळमृदुंगाचे गजरात भव्य विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. या मध्ये अंजगाव सुर्जी येथील महीला, पुरुष भजनी मंडळ , गावातील महीला भजनी मंडळ यांचे सह मोठ्या संख्येने गावकरी सामील झाले होते.
