नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
माहुली चोर येथील पूर्व माध्यमिक शाळेमध्ये आज दिनांक 08.09. 2025 रोजी शिक्षक दिन संपन्न झाला.ह्यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अध्यक्षस्थानी सरपंच सौ. संगीता झंजाट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विपिन काकडे त्याचप्रमाणे शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त शिक्षक यांचा सह पत्नी सत्कार करण्यात आला यामध्ये अशोक खवड सौ.धनश्री खवड गजानन तिखिले सौ.वर्षा तिखिले मुख्याध्यापिका वसंत विद्यालय यांचा शाल श्रीफळ दीप देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये रवींद्र भिसे मुख्याध्यापिका श्रीखंडे अर्चना जाधव मोपारी प्रीती दाते या शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. ह्यावेळी पालक वर्ग गावातील नागरिक महिला उपस्थित होत्या.

सौ. वर्षा जाधव सौ. निर्मला सौ.अर्चना सरोदे ग्रामपंचायत सदस्य सुधा जाधव विभा ढगे रत्ना गोतमारे गजानन चोरे बंडू जाधव यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वयंशासित शाळेचे आयोजन केले ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन संयोजन शहीद भगतसिंग वाचनालय मार्फत उपसरपंच राजेंद्र सरोदे यांनी केले.
