नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे संचालन शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी केले. सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कु. ज्ञानेश्वरी डांगे, गुंजन बडगे या विद्यार्थिनींनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्राचा ओघवता आलेख आपल्या अभिभाषनातून विद्यार्थ्यांसमोर मांडला.

‘ शिक्षक दिनाचे ‘ औचित्य, वाढदिवस आणि अनंत चतुर्दशी म्हणून बडे मॅडम यांनी शाळेला शमीचे रोपटे भेट म्हणून दिले.सदर कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपमुख्याध्यापक श्री. शशिकुमार देशमुख सर, पर्यवेक्षक श्री.राजेश देशमुख सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन श्री. घाटे सर व बडे मॅडम यांनी सांभाळले सांभाळले. शालेय मंत्रिमंडळ उत्तमरित्या त्यांची अंमलबजावणी केली.
