अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
गणेशोत्सव व शिक्षक दिनाचे औचित्य साधून धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान अमरावती द्वारा आयोजित बक्षीस समारंभ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,मखर सजावट स्पर्धा आणि मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भरपूर स्पर्धकांनी सहभाग घेतला. 
निबंध स्पर्धेत वयोगट 6 ते 10 मध्ये प्रथम क्रमांक युग रडके, द्वितीय क्रमांक मंजिरी इंगळे,तृतीय क्रमांक देवांशी इंगळे, प्रोत्साहनपर समृध्दी लोहकरे, वयोगट 11ते 14 मध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी ओलीवकर, द्वितीय क्रमांक अदिती महल्ले, तृतीय क्रमांक आज्ञा सोळंके, मोठ्या मध्ये प्रथम क्रमांक सायली वासनिक, द्वितीय क्रमांक तृप्ती काळबांडे, तृतीय क्रमांक रिद्धी देशमुख, चित्रकला मध्ये प्रथम क्रमांक विदिशा पानतावणे,द्वितीय क्रमांक वैष्णवी शिंदे, तृतीय क्रमांक आराध्या ठाकरे, मखर सजावट मध्ये प्रथम क्रमांक आयुष तायडे, द्वितीय क्रमांक अनिकेत आतकरे, तृतीय क्रमांक भावना देशमुख तर मोदक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वाती कथलकर, द्वितीय क्रमांक समृद्धी विंचुरकर यांना देण्यात आले.

बक्षीस समारंभाचे आयोजन शिवटेकडी खुला रंगमंच येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ. नितीन धांडे अध्यक्ष विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अम.तथा महानगराध्यक्ष भाजप,तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी अश्विन चौधरी अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी,

तर प्रमुख अतिथी प्रा. शोभनाताई देशमुख, माधुरीताई चव्हाण अंबाई बहुउद्देशीय संस्था संचालक, लीनाताई गावनेर, ॲड. छायाताई मिश्रा यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा रडके यांनी तर प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष मंजु ठाकरे व आभार प्रदर्शन सुचित्रा लहाने यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव आरती बोंदरकर, स्वाती काळे, ऐश्वर्या मडघे,शुभांगी टिंगरे, इत्यादी महिलांनी परिश्रम घेतले.
