विद्यापीठाकडून जर्मन भाषा मूल्यवर्धित अभ्यासक्रमास मान्यता
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून जर्मन भाषा मूल्यवर्धित अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली असून, जर्मन भाषा शिकण्याची विद्याथ्र्यांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.इन्ट्रोडक्शन टू दी जर्मन लँग्वेज भाग-1 व भाग-2 हा अभ्यासक्रम दोन सेमिस्टर मध्ये शिकवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये जर्मन भाषेची ओळख, मूलभूत व्याकरण, संभाषण कौशल्य, जर्मन संस्कृती आणि इतिहास यांचा समावेश आहे. विद्याथ्र्यांना भाषेवर प्रभुत्व मिळण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे भारतीय विद्याथ्र्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी एक नवीन मार्ग मिळेल, अशी अशा व्यक्ती केली जात आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही भाषा शिकल्याने विद्याथ्र्यांच्या करिअरच्या संधीमध्ये निश्चितच वाढ होण्याची शक्यता आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे विद्याथ्र्यांना केवळ जर्मन भाषेचे ज्ञान मिळणार नाही, तर जर्मनीमध्ये उच्च शिक्षण व नोकरीसाठी विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी वीस विद्यार्थी संख्या एवढी मर्यादा असून कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र आहेत. जर्मन भाषेचा अनुभव असलेल्या पुणे येथील प्रख्यात जर्मन भाषा अध्यापिका प्रा. प्राजक्ता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्र्यांना सदर अभ्यासक्रम शिकविला जाईल.या सुवर्ण संधीचा विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ.महेश व्यवहारे 7709710091 किंवा महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधावा,असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.
