सेल्फी पॉइंट ची तोडफोड झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लाखो भाविकांचा हिरमोड
नवरात्रोत्सवापूर्वी सेल्फी पॉइंटचे सुशोभीकरण करा
श्रीक्षेत्र माहूर / तालुका प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्यावर माहूर नगरपंचायत कडून आय लव माहूर असे लिहिलेले चकाकणारे इलेक्ट्रिक बोर्ड लावण्यात आले होते. या बोर्डाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याने नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्या लाखो भाविकांचा हिरमोड होत असून या ठिकाणी नवीन आय लव्ह माहूर चे बोर्ड सीसीटीव्ही कॅमेरे पेव्हर ब्लॉक वृक्षारोपण सह भाविकांना बसण्यासाठी नवीन अद्यावत बेंच लावून सुशोभीकरण करण्याची मागणी पत्रकार इलियास बावाणी यांनी निवेदनाद्वारे केली आहेतीर्थक्षेत्र माहूरगड हे निसर्गसंपदेने नटलेले असून डोंगरदऱ्या आणि डोंगरदर्यात वसलेले सर्व धर्मीय देवस्थाने आणि येणारे लाखो भाविक यामुळे माहूरचे नवलौकिक जगभरात पसरलेले आहे.

नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी गडावर जाणाऱ्या घाटात अतिशय निसर्गरम्य ठिकाण निवडून येथे शासनाद्वारे सूचित आय लव्ह माहूर या सेल्फी पॉइंटची निर्मिती केली होती परंतु या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी बेंच सीसीटीव्ही कॅमेरे पेव्हर ब्लॉक वृक्षारोपणासह सेल्फी पॉइंटला लागणारे इतर सुविधा बनविल्या नसल्याने अज्ञात समाजकंटक विघ्नसंतोशींनी आयलव्ह माहूर या इलेक्ट्रिक चकाकणाऱ्या बोर्डाची दगड मारून तोडफोड केली होती या प्रकरणी मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी माहूर पोलीस ठाण्यात अज्ञात विघ्न संतोषी विरुद्ध तक्रार देऊन हात वर केले होते तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही द्वारे शोध घेऊन अज्ञात समाजकंटकाविरुद्ध कारवाई होणे अपेक्षित असताना कुठलीच कारवाई झाली नसल्याने तसेच मुख्याधिकारी विवेक कांदे यांची या ठिकाणाप्रती हिरमोड झाल्याने कुठलीच दुरुस्ती किंवा सुशोभीकरण करण्यात आले नाही त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत असून लाखो भाविक माहूरगड ची आठवण म्हणून येथे सेल्फी काढून नेत होते त्यांचाही हिरमोड झालेला आहे.आय लव माहूर नावाचे डिस्प्ले नवीन मोठे आणि उंच करून येथे सीसीटीव्ही कॅमेरे पेव्हर ब्लॉक बेंच हाय मास्ट लाईट दिशादर्शक फलक यासह अद्यावत गार्डन सह इतर सुविधा नवरात्रोत्सवापूर्वी बनवाव्यात अशी मागणी पत्रकार इलीयास बावाणी यांनी निवेदनाद्वारे केली असून कर्तव्यदक्ष तथा पर्यटन प्रेमी तहसीलदार अभिजीत जगताप यांनीही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
