माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती साजरी
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल द्वारा संचालीत मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय प्रभू कॉलनी अमरावती येथे दि. 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद तिरमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून फोटो पुजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन नमन करण्यात आले.मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत डॉ.माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहीती सांगीतली. त्यांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यालयातील काही विद्यार्थी यामधे प्रामुख्याने अथर्व रवि राजूरकर, मंथन योगेश्वर ओले, सोहम बाळे व अंश खराटे यांनी आपले शिक्षकान प्रती आपले मनोगत व्यक्त करत शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकाना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा समारोप शिक्षकांचा सत्कार व आभार प्रदर्शनाने झाला.

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या नात्यातील प्रेम अधिक घट्ट झाले आणि हा दिवस शाळेसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महीना प्रमुख कु. कविता सुभाषराव देशमुख यांनी तर शेवटी आभार कु. मयुरा कांडलकर यांनी मानले. या कार्यक्रमा प्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक विनोद शंकरराव तिरमारे, ज्योती संजय झाडे, सारिका दिलीप वानखडे, रविंद्र मनकर्णाबाई रामकृष्ण सोळंके, अतुल ज्ञानेश्वर देशमुख, मयुरा जनार्दन कांडलकर, कविता सुभाष देशमुख,बाबाराव खंडाळे उपस्थित होते. अशी माहिती शिक्षक रविंद्र सोळंके यांनी दिली.
