ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आली भव्य रॅली
नेर परसोपंत/वसीम मिर्झा
दिनांक 5 सप्टेंबरला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती नेर शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोहम्मद पैगंबर यांचा जय घोष करत मिरवणुकीला सुरुवात झाली. सदर मिरवणूक नेर शहरातील रहेमनिया मस्जिद ते वली साहब दरगा ते वाई रोड पर्यंत काढण्यात आली.

ईद-ए-मिलाद निमित्त देशांमध्ये शांतता राहावी तसेच भाईचारा कायम राहावा अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली. यावेळी या रॅलीमध्ये रहेमानिया मस्जिद इमाम अर्शद रझा खान.दाऊद मस्जिद इमाम अल्ताफ रझा साहेब. शऊर खान . शारीब खान.आसिफ खान. मोहम्मद तौहीद. अब्दुल सुफियान .मोहम्मद रियाझ. उबैद खान .सहिम परवेझ. शोएब असीम खान. मोहम्मद अहेफाज पिंटू,नजीर राही. जफर सर.इम्रान खान अवईस खान मोहम्मद तौफिक,मोहम्मद नजीब. मोहम्मद साकिब,मोहम्मद तारीख तसदिक अनवर,नसीम नसीर खान, मोहम्मद राहील,शेख जफिर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.
