नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगाराचा वाटप हा चार महिन्याच्या नंतर सुरू झाला बांधकाम कामगारांना अगोदर जिल्हा ऑफिस यांच्याकडून कॉल ज्यांना यायचा त्यांना भांडे ची किट ्स चा वाटप हा करण्यात येत होता. अनेक कामगारांना कॉल येऊन सुद्धा तांत्रिक कारणामुळे वापस जावे लागत होती त्यासाठीच इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ यांनी असा निर्णय घेतला की काम कोणत्याही कामगाराला वापस जाण्याचे काम पडणार नाही आणि त्याला वेगवेगळ्या चार ठिकाणी भांड्याचा वाट पहा एका दिवशी अडीचशे जणांना होईल असा मंडळांनी निर्णय घेतला कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांच्या पाण्याची बसण्याची सोय हे तिथले जिथे कॅम्प आहे तिथे तेथील पदाधिकारी त्यांची व्यवस्था करेल असा मंडळांनी निर्णय घेतला त्याच्यानंतर सुद्धा 1)9) 2025 पासून बांधकाम कामगारांना भांडे वाटप हा सुरू झाला. आज जिल्ह्याभरातील कामगार एम झेड ढाबा या पत्त्यावर भांडी घेण्यासाठी येत आहे दररोज पाणी येत आहे पावसाचे दिवस आहे असे असताना तिथे कुठल्याही पिण्याच्या पाण्याची सोय नाही, चिखलामधे उभे राहण्याची वेळ येत आहे सकाळी 3 वाजता पासून कामगार हा त्या ठिकाणी येत आहे कोणाला काही दुखापत झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना च्या वतीने विचारण्यात येत आहे लवकरात लवकर 4 वेगवेगळ्या ठिकाणी भांड्याचा वाटप हा सुरू करण्यात यावा असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब आणि अमरावती जिल्हा कामगार आयुक्त वाघमारे मॅडम अमरावती यांना देण्यात आले निवेदन देते वेळी पीयूष शिंदे अमित गणवीर, माया शेंडे, रहमत शाह, पडघन, अजय लाड , सारंग काळबांडे कृती समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
