स्वस्त धान्य दुकानदार मार्च महिन्यापासून कमिशन पासून वंचित
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालय मध्ये तहसीलदार यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. फेब्रुवारी महिन्यापासून धान्य वाटप झालेले असून धान्य कमिशन मिळाले नाही त्यामुळे तालुक्यातील १३४ दुकान असुन सर्व परवानाधारक असुन ते अध्यापयी पैसे मिळालेले नाही त्यामुळे दुकानदार संघटनेचे मार्फत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावर तरी उपायोजना करून कमिशन मिळून देण्यात यावे असे सांगण्यात आले कमिशन न मिळाल्यास सोमरील येणार्या महिन्यातील राशन कार्ड धारकांना राशन मिळण्यात दिरंगाई झाल्या सर्वश्री शासन जबाबदार राहणार आहे त्यामुळे सर्वांचे कमिशन लवकरात लवकर जमा व्हावी असे सांगण्यात आले त्यावेळी नरेन्द्र तिडके तालुका अध्यक्ष, विनोद कडू ता ,सचिव, कृष्णराव पोपळघाटे, सुरेश कणसे, जयप्रकाश राणे, मारोतराव रामटेके, नितीन तह्रेकर सचिन ठाकरे, जितेंद्र घोडे,बगळे इत्यादी उपस्थित होते.
