रिद्धपूर/ प्रतिनिधी
गुलिस्ता उर्दू प्राथमिक शाळा मोर्शी येथे सेवारत सहायक शिक्षक अहमद हुसेन तजम्मूल हुसेन रिध्दपूर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने विविध उपक्रमांतर्गत आनंदमयी वातावरणात सोत्साह सत्कार सोहळा शाळेच्या शिक्षकवृंदांनी २ सप्टेंबर रोजी आयोजित केला होता.विद्यार्थ्यांनी यावेळी अहमद हुसेन यांचे जोरदार स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक मुश्ताक अहमद खान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सोहळ्याचे सुत्रसंचलन जमील अहमद यांनी तर आभारप्रदर्शन वसीम अहमद यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना इरफान यांनी जबाबदारी पार पाडली.यावेळी शिक्षकांनी तथा विद्यार्थ्यांनी समयोचित भाषणांद्वारा अहमद हुसेन १९९७ ते २०२५ दरम्यान सेवाकाळातील त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेऊन त्यांचे भावी आयुष्यासाठी शुभचिंतन व्यक्त केले. याप्रसंगी त्यांना विविध भेटवस्तू भेट देऊन गौरविण्यात आले.शाळेचे शिक्षक वकील नायक, जावेद खान, शिक्षिका शाहिना खान, जोहरा जबीन, नौसिन बानो, सबा परवीन, शमीम बानो, महेविश बानो व अनीस अहमद यांनी शुभेच्छा दिल्या.
