सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर स्थानिक माळीपुऱ्यातील सुभाष चौकातील 85 वर्षाची परंपरा लाभलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले.या या शिबिरामध्ये 300 च्या वर लोकांनी आरोग्याची तपासणी केली व 100 च्या वर युवकांनी आपला रक्तदानातं सहभाग नोंदविला या शिबिरासाठी

डॉ.राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या डॉक्टर मंडळींनी कामकाज सांभाळले. यात शल्य चिकित्सक डॉ. शिवाली ठाकरे, स्त्री रोग तज्ञ डॉ. रश्मी कहार, अस्थिरोग तज्ञ डॉ. समीर शेख, नेत्ररोग तज्ञ डॉ.संपदा कावळे, मेडिसिन विभागाचे डॉ. आर.बी. राठी, डॉ. फरहान खान, ब्लड बँकेचे पूजा बोरकर स्तुती थोरात, समन्वयक स्वप्निल वेरुळकर, पुनम कारकून रक्षा काळे, आकाश माहुरकर यांचा समावेश होता. यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर,डॉ.संजय जेवडे, अमोल धवसे,फिरोज खान, गजानन मारोटकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिषेक पारसकर, भूषण डोक, ऋषिकेश मारोटकर, सागर लाड, उमेश सोनोने, राहुल गटुले, अमोल ढंगारे, गौरव चांदणे, चेतन मारोटकर,पृथ्वी परसनकर, सचिन चहाकर, स्वप्नील गतफणे, प्रसाद चांदणे, अक्षय मारोटकर, शुभम परसनकर, ओम मारोटकर, उमेश झीमटे, अंकित काळेकर, ओम काळेकर सागर धांडे, आशिष गावंडे, सौरभ मारोटकर, विशाल काळेकर, अमोल गटुले,चेतन मारोटकर व मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश मंडळाला चार पाच वर्षापासून पोलीस प्रशासनाचा उत्कृष्ट गणेश मंडळ द्वितीय,तृतीय क्रमांक मिळत असून यावर्षी मंडळाचे स्वच्छता, सामाजिक प्रबोधन,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अभिषेक पारसकर
(अध्यक्ष सार्वजनिक मंडळ )
