धामणगाव रेल्वे/ तालुका प्रतिनिधी
तळेगाव दशासर येथील तासन तास लाईन बंद राहता त्या मुळे गावकरी त्रस्त झाले आहे.आज गावात जवळपास सर्व घरी गौरी पूजन थाटामाटात व मंगल वातावरणात पूर्ण होत आहे, घरात समृद्धी यावी याकरिता सर्वजण महालक्ष्मी पूजन करतात.

परंतु गावातील सततच्या विजेच्या लपंडावामुळे गावात अवकळा आल्या सारखी वाटते तांत्रिक कारणाने लाईन जाणे हे आम्ही समजू शकतो, पण वारंवार येत जात राहणाऱ्या लाईन ने गौरी गणपतीच्या सणाला ग्रहण लावले असेच म्हणावे लागेल परंतु या विजेचा याण्या जाण्याचा कारना मूळ गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या कडे गांभीर्यानं लक्ष द्यावा अशी अपेक्षाही गावकरी करत आहे.
