माजी आमदार स्व भैय्यासाहेब देशमुख यांच्या जयंती दिना निमित्य कृष्णाबाई देशमुख विद्यालयात आदरांजली कार्यक्रम संपन्न
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अचलपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेलचे संस्थापक अध्यक्ष कै. नरसिंगराव उपाख्य भैय्यासाहेब दादा देशमुख ( तळवेलकर )यांची जयंती निमित्य विविध कार्यक्रम व उपक्रम घेवून मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय प्रभू कॉलनी अमरावती येथे संपन्न झाली.

या प्रसंगी कै.भय्यासाहेब देशमुख यांच्या आठवणीना उजाळा देतांना मुख्याध्यापक विनोद तिरमारे यांनी कार्याचा परिचय करुन देत असतांना दादासाहेबांनी सुरु केलेले विविध उपक्रम यामधे प्रामुख्याने माहेरवासिनी,वृध्द सन्मान दिन,स्व. माईसाहेब वकृत्व स्पर्धा,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, क्रिडा स्पर्धेचे आयोजन,विद्यार्थी वाढदिवस, वृक्षारोपण व इतरही उपक्रमाची विद्यार्थ्यांना आठवण करुन दिली. सोबतच भय्यासाहेब हे निर्भीड वक्ते होते आणी त्यांच भाषेवरच प्रभूत्व,

शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य या बाबत सुध्दा माहिती आपल्या भाषणातून देत असतांना विनोद तिरमारे म्हणाले की कै. भय्यासाहेब देशमुख ( तळवेलकर ) यांच्या सारखे नेते पुन्हा होणार नाही.यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थानी कै.भय्यासाहेब देशमुख( तळवेलकर ) यांच्या स्मृतीस अभिवादन केले.त्यानंतर वर्ग सातवी ची विद्यार्थ्यांनी कु.किंजल बाणूबाकडे चा वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्व विद्यार्थाना खावू वाटप करुन सोबतच विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र सोळंके यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक विनोद शंकरराव तिरमारे, सारिका दिलीप वानखडे, रविंद्र मनकर्णाबाई रामकृष्ण सोळंके,अतुल ज्ञानेश्वर देशमुख, निलेश मनोहर विधळे, मयुरा जनार्दन कांडलकर, कविता सुभाष देशमुख, गजानन मालवे, राजेश कोल्हेकर, बाबाराव खंडाळे आणि सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती शिक्षक रविंद्र सोळंके यांनी दिली.
