नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मेजर ध्यानचंद जयंती निमित्त क्रीडा दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. प्रदीप रा. ठाकरे, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक श्री. राजेश देशमुख, श्री.जगदीश गोवर्धन, श्री.महेंद्र इंगोले, कु. जयश्री देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

सर्वप्रथम, मेजर ध्यानचंद व शिक्षण महर्षि डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. जयश्री देशमुख यांनी केले. “मेजर ध्यानचंद यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व विश्वात होणे नाही” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री प्रदीपजी ठाकरे यांनी केले. आभार श्री. महेंद्र इंगोले यांनी केले. कार्यक्रमा करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
