‘इको-फ्रेंडली’ डेकोरेशनला भक्तांची पसंती
नागरिकांमध्ये अभूतपूर्व उत्साह
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
गणेशोत्सवासाठी आरास व सजावट साहित्यांनी बाजारपेठा बहरल्या आहेत. पणत्या, रंगीबेरंगी रोषणाई, मखर, तोरण आणि विविध प्रकारच्या फुलांच्या माळांनी पेठा फुलून गेल्या आहेत. यंदा पारंपरिक साहित्यासह पर्यावरणपूरक आणि आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही मागणी आहे.बाजारात लाकडी, रबर शीट, फोम शीट, फायबरपासून बनवलेले मखर उपलब्ध आहेत. यामध्ये राजेशाही सिंहासन, मोर, कमळ, अशा अनेक डिझाइन्सना ग्राहकांची पसंती आहे. थर्माकोलला पर्याय म्हणून पुठ्ठा आणि कागदापासून बनवलेले मखर आणिसजावटीचे साहित्य आले आहे. ते वजनाला हलके आणि पर्यावरणपूरक आहे. मूर्तीना आकर्षक रूप देण्यासाठी रंगीत वस्त्रे, दागिने आणि मुकुट यांनाही मागणी असल्याचे दिसून येत आहे.
आयत्या छोटचा डेकोरेशन सेटअपला मागणी
बनवायला सोपे, दिसायला आकर्षक असल्याने आयत्या छोट्या डेकोरेशन सेट अपला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून येत आहे.गणेशोत्सवासाठी आरास व सजावट साहित्यांनी बाजारपेठा बहरल्या आहेत.प्लास्टिक नको! थर्माकोल आणि शासनाने सर्वत्रच प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घातली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमीही प्लास्टिक आणि थर्माकोल वापरू नका, असे आवाहन करत आहेत. त्याला प्रतिसाद देत गणेशभक्त पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य देत आहेत.

स्वतः सजावट करण्यावर भर
सजावटीसाठी कागदी फुले, रंगीत कापड, मोत्यांच्या माळा, विविध रंगांचे कागद, पुढे, गोंद, चमकी आणि नैसर्गिक रंग यांसारख्या वस्तूंना मोठी मागणी आहे. फ्लोरल डिझाइन, लटकन, झुंबर, लटकन या साहित्यांचा वापर करून गणेशभक्त स्वताच देखावा, कलाकुसर, हार आणि तोरण बनवत आहेत.
चायनीज माळांचीच चलती
रोषणाईसाठी साध्या विद्युत माळांपासून ते चायनीज कंदील, एलईडी दिव्यांचे तोरण, फिरते दिवे, एलईडी अक्षरे अशा अनेक प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.यावर्षी पुठ्याचे आणि कागदी मखर बनवले आहेत. प्लास्टिकच्या किंवा थर्माकोलच्या वस्तूऐवजी कापड़ी किंवा कागदी फुले आणि नैसर्गिक वस्तूंची मागणी आहे. छोट्या डेकोरेशन सेटअपला पसंती आहे विक्रेते सांगतात.गणेशोत्सव अजून जवळ आल्यावर गर्दीत वाढ होईल. राजेशाही सिंहासन, मोर, कमळ अशा अनेक डिझाइन्सना ग्राहकांची पसंती आहे.
