वरुड / तालुका प्रतिनिधी
काठीवाले सभागृह येथे भोई समाज युवा फाउंडेशन यांच्या वतीने स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी विविध क्रीडा स्पर्धेत प्रवीण प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा समारंभाचे उद्घाटक म्हणून मोर्शी/ वरुड विधानसभेचे आमदार उमेश यावलकर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद मोरे प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ भोई सेवा संघाचे अध्यक्ष उकडराव सोनवणे, पश्चिम विदर्भातील अशोक लेलँड कंपनीचे विक्रेता उद्योजक सुरेश वानखडे, प्राचार्य अरुण कावनपुरे, पत्रकार संजय गारपवार, मारोतराव सातरोटे, सुभाष श्रीनाथ, भीमराव कुरवाडे,मधुकर बोरवार, एड निखिल बावणे, माजी मुख्याध्यापक मंगलराव सुरजुसे, पुंजाजी नेमाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात मत्स्य महर्षी स्वर्गीय खासदार ज्योतीराम बर्वे यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले होते. यावेळी इयत्ता 10 व इयत्ता 12 वी तसेच वैद्यकीय पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ शील व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला होता. उद्घाटक म्हणून यावलकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भोई समाजातील मतदार बांधवांनी मला विधानसभेत भरपूर मतदान केले असल्यामुळे त्यांची प्रलंबित असलेली समाज भावनाची मागणी समाज बांधवांनी जागा उपलब्ध करून दिल्यास भरपूर निधी देण्यात येईल असे आश्वासन दिले. येत्या काळात भोई समाज भवन निर्माण होईल असे समाज बांधवांना आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्राचार्य अरुण कावनपुरे यांनी केले, सूत्रसंचालन रवींद्र सुरजुसे व नांदने मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन वसंत बावणे यांनी केले. यावेळी विदर्भातील भोई समाज बांधव विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भोई समाज युवा फाऊंडेशन वरूड आणि आयोजक समिति चे अध्यक्ष सुखदेव सुरजुसे, उपाध्यक्ष प्रशांत सुरजुसे, सचिव दीपक लाड़, इत्यादीने अथक परिश्रम घेतले होते.

