राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम
चांदुर बाजार/एजाज खान
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व तालुका आरोग्य विभाग, चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोगमुक्त ग्राम अभियान आणि क्षयरोगाविषयी माहिती या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका क्षयरोग अधिकारी शहा सर, तालुका कुष्ठरोग अधिकारी गवई सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण परिमल, महिलाकार्यक्रमाधिकारी डॉ. निधी दीक्षित, आरोग्य सेवक श्री जावरे, आरोग्य सेविका कु. वाकोडे, कु. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविकपर भाषणातून रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण परिमल यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका सविस्तर मांडले. प्रमुख मार्गदर्शक आरोग्य अधिकारी शहा सर यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगासंबंधी मार्गदर्शन करताना म्हणाले, क्षयरोग हा विषाणूजन्य रोग असून तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाच्या रूपात होतो असे म्हणून क्षयरोगासंबंधीचे लक्षणे आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर कुष्ठरोगावर मार्गदर्शन करताना आरोग्य अधिकारी गवई सर यांनी कुष्ठरोग हा भयंकर रोग असून याला अगोदर महारोग म्हणून सुद्धा ओळखल्या जायचे. या रोगामुळे व्यक्तीला अंगावर पांढरे किंवा तांबडे चट्टे येतात असे म्हणून या रोगावर शासकीय रुग्णालयात योग्य उपचार केले जाऊ शकते असे म्हणाले तर प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात जाऊन अशा रोग्यासंबंधी जनजागृती करावे असे म्हटले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लालबा दुमटकर यांनी केले तर आभार डॉ. निधी दीक्षित यांनी मानले. सबब कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
