
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये सौ. सुधा जाधव ग्रामपंचायत सदस्य यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले त्याचप्रमाणे शहीद भगतसिंग वाचनामध्ये प्रकाशराव तिखिले यांनी यांचे हस्ते तर पूर्व माध्यमिक शाळा येथे मुख्याध्यापिका सौ. श्रीखंडे वसंत विद्यालय येथे सरपंच सौ. संगीता झंजाट यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचे अवचित्त साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृक्ष संवर्धन पंधरवडा, श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांची 750 वी जयंती, महोत्सव वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड ,हरित ग्राम, पर्यावरणाचे संरक्षण इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन गावांमधून भव्य दिव्य दिंडी काढण्यात आली त्यामध्ये पूर्व माध्यमिक शाळेची विद्यार्थी लेझीम पथक वसंत विद्यालय शाळेचे विध्यार्थी ,ग्रामपंचायत आरोग्य विभाग, ग्रामस्थ, युवक यांनी सहभाग घेतला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात आला अशावेळी गावातील भजन मंडळी श्री. अंबादेवी भजन मंडळ, रुक्मिणी भजन मंडळ, दादाजी भजन मंडळ, सामाजिक वनीकरण वारकरी भजन मंडळ यांनी भाग घेऊन बैलजोडीचा रथ आणि पालखी असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याबद्दल सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सौ. संगीता झंजाट, राजेंद्र सरोदे, सुधा जाधव ,निखिल चोरे ,रोशन पवार ,विभा ढगे, रत्ना गोतमारे ,निशा खंडारे, अरविंद गाडेकर सचिव अरुण रायबोले यांनी सर्वांचे आभार मानले त्याचप्रमाणे रोटरी इंद्रपुरी अमरावती चे अध्यक्ष ओम प्रकाश लालवानी व त्यांचे सहकारी सुद्धा या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश ढवळे गजानन गाडेकर पुष्पा गोमासे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहभाग दिला.