
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
चांदूररेल्वे तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव दैनिक् पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी बंडू आठवले यांचे जेष्ठ बंधू *माजी सैनिक तसेच भूमी अभिलेख विभाग, परभणी येथून सेवानिवृत्त झालेले भारत पुंडलीकराव आठवले यांचे वयाच्या ६३ वर्षी शनिवार १६ ऑगस्ट रोजी, अमरावती येथे आजारांवर घेत असलेल्या उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. भारत आठवले यांनीब आपल्या आयुष्याची १७ वर्षे त्यांनी देश सेवेत घालवली त्यांनतर भूमी अभिलेख विभागात पराभणी येथे त्यांनी सेवा दिली. स्वभावाने शांत- सरल व संयमी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांचा मागे पत्नी ,भाऊ ,दोन मुली, एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंतयात्रा उद्या रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांचे राहते घर मिलिंद नगर येथून निघून बौद्ध स्मशानभूमी मध्ये त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात येईल.