
अन्यथा बसेस न थांबल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन – AISF ची मागणी
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
शिवणी रसलापूर ता. नांदगांव खंडेश्वर येथे बस थांबा आहे. येथून दररोज 100-150 चे आसपास शालेय विद्यार्थी शिक्षणा साठी ये-जा करीत असतात. येथून अमरावती व नांदगांव खंडेश्वर येथे शिक्षणासाठी विद्यार्थी जात असतात. ज्याकरीता विद्यार्थ्यांकडे शालेय पासेस असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परीवहन बसेसचा वापर विद्यार्थ्यांना करावा लागतो. बसेस थांबा असून हात दाखविल्यानंतर बस थांबत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असून मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच एस टि वाहक बस थांबवत नाही व विद्यार्थ्यांशी उर्मट भाषेत बोलतात. हया विषया संदर्भात त्वरीत योग्य तो निर्णय घेवून आम्हाला न्याय देण्यात यावा.
अशा सुचना एस. टी-बस वाहक व चालकांना देण्यात याव्या. अन्यथा बसेस न थांबल्यास कोणत्याही क्षणी तीव्र स्वरुपाचे आंदोलन रास्ता रोको करण्यात येईल.असे निवेदन AISF शाखा शिवणी रसुलापुर च्या वतीने DTO रायलवार साहेब,विभागीय कार्यालय, अमरावती येथे देण्यात आले. शिवणी रसुलापुर येथे बसेस थांबवण्याच्या सूचना आमच्या कर्मचाऱ्यांना देऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले.निवेदन देते वेळी आर्यन वंजारी, सनी कारमोरे, करण लांबटकर, मनस्वी ढोके, रोशनी लांबटकर, समीक्षा लांजेवार, अक्षरा बनकर, नम्रता रघुते, नवीका रघुते, ईशाखा किरणापुरे, व AISF चे पदाधिकारी उपस्थित होते.