
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोहळा अत्यंत उत्साहात झाला. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, श्रद्धा उदावंत, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा सूचना अधिकारी मनीषकुमार, तहसीलदार विजय लोखंडे, निलेश खटके, प्रशांत पडघन, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.