
राजकीय हस्तक्षेप आणि वरिष्ठांचे आशीर्वाद असल्याची चर्चा, जनतेतही नाराजी सुर
अचलपूर / तालुका प्रतिनिधी
अचलपूर बांधकाम उप-विभागातील शाखा अभियंता श्री झगडे हे मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रभारी उप- अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या जीआरनुसार कोणताही प्रभारी अधिकारी दोन ते तीन वर्षे जास्त कालावधीसाठी नियुक्त ठेवू नये, असा स्पष्ट नियम आहे. मात्र, झगडे यांच्याकडेच तीन वर्षांपासून उप- विभागाचा चार्ज कायम ठेवण्यात आलेला आहे, ही बाब प्रशासन व राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामान्य जनतेमध्येही तीव्र चर्चेचा विषय ठरत आहे.हा उप-विभाग जिल्हा परिषद अमरावतीच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. अचलपूरच्या कार्यालयातच पात्र व अनुभवी कर्मचारी उपलब्ध असूनही त्यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवलेली नाही. यामुळे नियमानुसार कारभार करण्याऐवजी, ठरावीक अधिकाऱ्यालाच अभय देण्यात येत असल्याचे चित्र जनतेच्या मनात निर्माण झाले आहे.यामागे राजकीय हस्तक्षेप आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची कुजबूज आहे. श्री नितीन झगडे यांना पदावरून न हटविण्यामागे प्रशासकीय उद्देश काम करत असल्याचे बोलले जात आहे. दर्यापूर, मोशी,येथील नियमित डेप्युटीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, अमरावती, मोर्शी आणि दर्यापूर येथे रेग्युलर डेप्युटी अधिकारी उपलब्ध आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही अचलपूरचा चार्ज देता आला असता, तरीही तो झगडे यांच्याकडेच कायम ठेवला जातो, हे स्पष्टपणे एकतर्फी व पक्षपाती धोरणाचे उदाहरण आहे.या प्रकारामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र नाराजीचे वातावरण असून, काही कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO मॅडम) यांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.विशेष म्हणजे, आता सामान्य अचलपूरकर नागरिकही या विषयावर बोलू लागले आहेत. “एका व्यक्तीकडेच वर्षानुवर्षे चार्ज देण्यामागे काय राजकारण आहे?”, असा सवाल जनतेमध्ये उपस्थित होत असून, पारदर्शक व नियमानुसार प्रशासन व्हावे, अशी भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे.राजकीय हस्तक्षेप आणि वरिष्ठांचे वरदहस्त असल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात असून, यावर लवकरच ठोस निर्णय न घेतल्यास लोकांचा प्रशासनावरील विश्वास उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.