
चांदूर बाजार / एजाज खान
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे इको फ्रेंडली राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. निसर्गातील पान फुलं आणि धान्य यापासून राख्या बनवल्या.इको-फ्रेंडली राखी वापरल्याने पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते आणि लोकांना पर्यावरणाची काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. युगंधरा गुल्हाने यांनी केले . सुंदर सुबक राख्या बनवल्या बद्दल प्राचार्य राजेंद्र रामटेके यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केले. उपप्राचार्य डॉ. गव्हाळे सर यांनी आपण सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली पाहिजे असे मत व्यक्त केले. या वेळेला परीक्षक म्हणून डॉ. पार्वती शिर्के यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्कर दादा आणि सचिव डॉ. विजय टोम्पे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी आभार प्रदर्शन डॉ. उमेश कनेरकर यांनी मानले. या प्रसंगी डॉ. परिमल प्रा. प्रशांत यावले, डॉ. बिजवे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये गोपाळ सुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.