
42 रक्तदात्यांनी केले रक्तदान
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुप अमरावती विदर्भ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे 10 ऑगस्ट 2025 या रोजी रेस्ट हाऊस नांदगाव खंडेश्वर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश सुरेश घोडे नांदगाव खंडेश्वर यांनी सांगितले की थॅलीसीमिया. सिकलसेल. अॅनेमिया अशा आजाराच्या पेशंटला रक्ताची कमतरता भासत आहे आपल्या ग्रुपचे सदस्य श्री विलास धांडे यांच्या वाढदिवसा निमित्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रक्तसंकलना करिता श्री संत गाडगेबाबा रक्तपेढी बडनेरा रक्तपेढीची सहकार्य मिळाले यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश सुरेश घोडे व सचिव श्री सागर दामेकर श्री मनोज गावंडे श्री विलास धांडे श्री मनोज जैन श्री चंद्रशेखर काळेकर बजरंग दलचे अध्यक्ष श्री कांतेश्वर नागोलकर श्री निलेश हळदे श्री विनोद मासोतकर सौ सोनाली देशमुख व तसेच श्री संत गाडगेबाबा रक्तपेढी बडनेरा येथील डॉक्टर अनिल कवीमंडन सौ कविता मारुडकर सौ राजश्री पाटील श्री विकास खंडार श्री सोपान गोडबोले श्री मोहित खासबागे श्री ऋषिकेश राऊत यांची उपस्थिती होती.