
माजी सुभेदार जगन्नाथजी गवई यांचे निधन
चांदूर रेल्वे/ तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे शहरातील मिलिंद नगर मधील माजी सुभेदार तथा नगरपरिषद उपाध्यक्ष जगन्नाथजी गवई हे एक असं वादळ होतं की, संघर्षा तून पेटून उठणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे व्यक्तिमत्व, सेवानिवृत्त फौजी समाजसेवक अखेर वयाच्या 91 व्या वर्षी आज शांत झाले. जगन्नाथ गवई ह्यांच्या वडीलाचे 1952 मध्ये निधन झाले. अवघ्या 19 व्या वर्षात परिवाराची जबाबदारी आली ही पूर्ण करण्यासाठी व परीवाराच्या गरजा भागविण्यासाठी जगन्नाथजी गवई हे युवा अवस्थेत जिवलग मित्र पुंडलिकराव आठवले यांना सोबत घेऊन 1954 ला सैन्यात भरती झाले.काही कारणास्तव माझे वडील सैन्य दलातून परत आले मात्र माजी सुभेदार गवई ट्रेनिंग पूर्ण करत शिपाई म्हणून सैन्य दलात देशसेवा सुरू करत सुभेदार हे मेजर पर्यंत पोहोचून कारकिर्द पूर्ण केली.1962 आणि 1965 साली भारत पाकिस्तान युद्धामध्ये लढाई लढले.असा हा लढवय्या बाणा आपली देशसेवा करून 1972 मध्ये सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्ती होऊन स्वगृही परत आले असा हा लढवय्या बाणा सेवा देशसेवा ते समाजसेवा करत सामाजिक कार्य असा जीवनाचा नवा प्रवास सुरू केला त्यांचे लहान बंधू शेषरावजी गवई त्यावेळी नगरसेवक होते.23/2/1986 साली शेषरावजी गवई यांचं दुःखद निधन झाल्या नंतर पोटनिवडणुकी मध्ये माजी सुभेदार नगरसेवक म्हणून निवडून आले.दुसऱ्यांदा पण नगरसेवक म्हणून विजयी झाले. दोन्ही वेळेस नगरपरिषद मध्ये उपाध्यक्ष राहिले. त्यावेळी गणेश रॉय नगराध्यक्ष होते.अनेक विषय हाती घेऊन एक आक्रमक आणि बुलंद आवाज म्हणून त्यांनी आपली भूमिका नगरपरिषद प्रशासना समोर मांडली.चांदूर रेल्वे शहरातील मटण मार्केटचा विषय तर दिल्ली पर्यंत त्यांनी लाऊन धरला.10 वर्ष नगरसेवक म्हणून आपले सामाजिक राजकीय कार्य केले.सैन्य दलात मिळालेली सुभेदार मेजरची पदवी ते नगरपरिषद उपाध्यक्ष पद भूषवित दादासाहेब झाले.काळ कोरोनाचा होता आपल्या स्वतःच्या सेवानिवृत्ती पेन्शन मधून गोरगरीब जनतेला किराणा वाटप केला.असे हे एक लढवय्ये व्यक्तिमत्त्व, दानशूर शूरवीर बाणा, आज अखेर शांत झाले.त्यांच्या सोबत सामाजिक कार्य किंवा राजकीय विषयावर चर्चा करीत असताना अनेकदा वादविवाद झाले.परंतु ते माघार कधी घेत नव्हते.अशी ही आमचे मामा शूरशिपाई लढवय्य व्यक्तिमत्व आज आमच्यातून हरपलं
मामा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
बंडु पुंडलिकराव आठवले पत्रकार पुण्यनगरी चांदूर रेल्वे
माजी नगरसेवक