
महाराष्ट्राचे राज्य संघटक आझाद जमा खान यांनी दिली माहिती
भारताचे संगणक क्रांतीचे शिलेदार विवेक सावंत यांच्या सोबत होईल संवाद
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
समाजात राबलेल्या एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, त्याला, त्याच्या कामाला समजून घ्यावं आणि आपण, आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधावं, बुद्धिमान समाज उभा राहिला पाहिजे. तुमच्या विचारांना, स्वप्नांना, आणि कृतीला एक नवी दिशा मिळावी. देशात जास्तीत जास्त जबाबदार नागरिक घडावे असा एक ‘संवाद सहवास‘ नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो. पुणे येथील शिक्षक भवन, नवी पेठ , गांजवे चौक, पत्रकार भवनाच्या शेजारी , पुणे येथे दिनांक : 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. आताचा संवाद सहवास होतोय भारताचे संगणक दिग्गज विवेक सावंत यांच्याशी. ते संगणक क्रांतीचे शिलेदार आहेत.या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके, संजय आवटे, डॉ. कुमार सप्तर्षी, सयाजी शिंदे, निरंजन टकले, ॲड. असीम सरोदे यांच्याशी झाले. आता संवाद सहवास होतोय भारताचे आयटी दिग्गज विवेक सावंत यांच्याशी. आपण घेत आहोत अशी माहिती अक्षर मानवचे राज्य संघटक आझाद खान यांनी अमरावती मध्ये माहिती दिली. अक्षर मानव कला आणि साहित्य: समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम, कार्यशाळा, आणि सांस्कृतिक उपक्रम. बुद्धिविकास: विचारांना चालना देणाऱ्या चर्चा, परिसंवाद, आणि शैक्षणिक उपक्रम.सामुदायिक बांधिलकी: गावापासून राज्यापर्यंत, प्रत्येक स्तरावर माणसांना एकत्र आणणारे उपक्रम. मदतीचा हात: एकमेकांना साथ देण्यासाठी, कर्तृत्वाला वाव देण्यासाठी, आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी. अक्षर मानव ही संघटना केवळ राज्यातीलच नव्हे, तर देश आणि जग पातळीवर माणुसकीचे काम करणारी संघटना आहे. कोणतेही काल्पनिक भेद न मानता, माणूस निव्वळ माणूस म्हणून जगू शकतो ही शिकवण देणारी संघटना आहे. असेही अक्षर मानव महाराष्ट्राचे राज्य संघटक आझाद जमा खान यांनी यावेळी आवर्जून सांगितले.माणसाला माणसाशी जोडण्याचा, जाती-धर्म-पंथ-लिंग यांच्या पलीकडे जाऊन समता आणि बंधुता निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश खूपच उदात्त आहे. विशेषतः, बौद्धिक विकासावर आणि माणसाच्या विचारशक्तीला चालना देण्यावर या उपक्रमाचा मुख्य भर आहे, जो आजच्या काळात अत्यंत गरजेचा आहे. *”कौटुंबिक व सामाजिक प्रश्न सोडवणारी संघटना”* म्हणून काम करत आहे. निवांत, शांत ठिकाणी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे. या एक दिवसीय कार्यक्रमात जेवण आणि चहाची व्यवस्था आहे. कुणाची गैरसोय होवु नये म्हणुन कार्यक्रमाला येण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. माणसाला माणूस जोडण्याचा संकल्प! आमच्या संवाद सहवास कार्यक्रमाला या, आणि एका नव्या, सुंदर विश्वाची निर्मिती करा! अशी माहिती अमरावती अक्षर मानवच्या जिल्हा सचिव सौ. अश्विनी वितोंडे-खान यांनी माहिती दिली. नावनोंदणी संपर्क सौ.आसावरी कुलकर्णी, पालकमंत्री, संवाद सहवास महाराष्ट्र राज्य. यांच्या सोबत आपण संपर्क करु शकता. 9881496012, 9766096906 या संवाद सहवास कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे राज्य कार्यकारिणीच्या मुख्य पदाधिकारी यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.