
चांदुर बाजार/एजाज खान
१ऑगस्ट२०२५ पासून महाराष्ट्र सरकार कडून ई पिक पाहणी ही योजना चालू झालेली आहे . पाच दिवस होऊन सुद्धा शेतकरी बंधू कडून ई पीक पाणी यशस्वी होईना.शेतकरी बंधूंनी शेतावर जाऊन ई पीक पाहणी हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड केले. शेतात गेल्यानंतर कधी प्रोसेस केल्यानंतर कधी ओटीपी येईना तर कधी प्रोसेस फक्त गोल गोल फिरत होती. तर काही शेतकऱ्यांना लोकेशन मिळत नाही.यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी या ई पिक पाहणीचा नाद सोडून दिला. शेतकऱ्यांनी एक वेळा नाही तर पाच ते सात वेळा या ई पिक पाहणी ॲप्स च्या माध्यमातून प्रयत्न केला. कृपया कोणता प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करून शेतकऱ्याला ई पिक पाहणी करताना अडथळा येणार नाही आणि यासाठी सर्वतोपरी राज्य शासनाने पाऊले उचलावी.
ई पिक पाहणी यासाठी शासनाने प्रत्येक महसूल मंडळातील सांजामध्ये शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी कार्यशाळा घ्यावी. जेणेकरून शेतकरी आपल्यामोबाईल मध्ये ई पिक पाहणी करू शकतील.
पुष्पक श्रीरामजी खापरे
जिल्हाधिकारी फळ पिक विमा समिती सदस्य अमरावती