
मोतीबिंदू मुक्त नागरिक अभियान डी.एम.एक्स ग्रुप संस्थापक ऋतिक गोपालराव मालपे यांनी हाती घेतले
नागरिकांचा अतिशय उत्कृष्ठ सहभाग*
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित व डी.एम. एक्स. ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वर्धापन दिनानिम्मित खासदार डॉ. अनिलजी बोंडे, आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर व भाजपा जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या शिबीरामध्ये 25 लोकांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. सर्वांची मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सर्वांनी हिवरखेड च्या लोकनियुक्त सरपंच सौ सविताताई गोपाळराव मालपे यांचे आभार व्यक्त केले. शिबिरातील लोकांना शस्त्रक्रियेसाठी पाठवताना गावच्या सरपंच सौ सविताताई गोपाळराव मालपे,डी.एम. एक्स. ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक ऋतिक गोपालराव मालपे, हिवरखेड चे उपसरपंच श्री सचिनदादा तायवाडे, डॉ. रवींद्र कुबडे, श्री सतीश धोटे, श्री नंदकिशोर गांधी, चि. अमोल पाचरे, श्री दीपक आहाके, श्री गोपालराव मालपे व गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.