
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
डायल 112 वर गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे हद्दीतील ग्राम चिरोडी येथे काही इसम सार्वजनिक ठिकाणी “बादशहा” नावाचा जुगार खेळत असल्याचे समोर आले. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गावात धाड टाकली.धाडीत खालील आठ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, सतीश सुदाम राठोड (वय 30), सुधाकर दादाराव राठोड (वय 25), रामचरण शाहू जाधव (वय 48),तेजा सुकलाल राठोड (वय 50), विनोद रामलाल भलावी (वय 45),श्याम दादाराव राठोड (वय 26),महादेव रामसिंग राठोड (वय 45),ब्रह्मकुमार उर्फ युवराज भारत चव्हाण (वय 35) सर्वजण राहणार चिरोडी.सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी या व्यक्तींकडून रोख रक्कम ४७९० रुपये, ५२ तास पत्त्यांचे पत्ते, ३ मोबाईल फोन असा एकूण २९,७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे, व पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहिर, पीएसआय नंदलाल लिंगोट, तसेच चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केली.