
बडनेरा / प्रतिनिधी
बडनेरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा यांचे निधीतून बांधण्यात आलेल्या नालंदा बुद्ध विहारासमोरील कॉंक्रिट रस्त्याच्या दुतर्फा पेव्हिंग ब्लॉक्स फिटिंगच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचाचे अध्यक्ष एकनाथ वासनिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. युवा स्वाभिमान संघटनेचे विभागीय पदाधिकारी सचिन भेंडे व साईनगर बुद्ध विहार कृती समितीचे मुख्य संयोजक देवा शेंडे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मा.आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून धम्ममंचावर उपस्थित होते.तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाईंच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. परिसरातील नागरिक व विहाराच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नालंदा परिवारातील कार्यकर्ते, डॉ. प्रफुल्ल वराळे व डॉ. दिपक भगत यांची अमरावती विद्यापिठांतर्गत “पी.एच.डी. चे गाईड” म्हणून निवड झाल्याबद्दल, मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.नालंदा बुद्ध विहाराचे सचिव सुरेश दांडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर विहाराचे प्रसिद्धीप्रमुख सूरज मंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. पेव्हिंग ब्लॉक्स फिटिंग सोबतच, विहारासमोरील अशोकवाटिकेमध्ये नियोजित सभामंडप बांधकामास लवकरच सुरवात होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. नागरिकांच्या गरजांची आपल्याला जाणीव असून, परिसराच्या विकासाकरिता आपण पूर्णता कटिबद्ध असल्याची भावना सचिन भेंडे व देवा शेंडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला रविंद्र चवरे, विनायक दुधे, भगवान इंगळे, विलास मोहाडे, साहेबराव नाईक, चंदू रामटेके, अरुण रामटेके, पद्माकर मांडवधरे, संजय रामटेके, रविंद्र गेडाम, सागर खंडारे, पुरुषोत्तम भटकर, प्रल्हाद इंगोले, सुनील शेंडे, जानराव वाघमारे, अवधूत शेंडे, सत्यवान लांजेवार, सहदेव गजभिये, गौतम गजभिये, निलेश दांडगे, नागेश खोब्रागडे, छत्रपती पवार, नाना गवई, शैलेश मोहोड, रवी मेश्राम, सुनील तायडे, प्रमोद मेश्राम, मनोहर दंदे, शंकर मेश्राम, भा.ई. सरकटे, वामनराव रामटेके, चंद्रमणी गणवीर, श्रीकृष्ण दहीकर, अरुण बडगे, अशोक खवड, रामचंद्र खंडारे, सरदार, वाघमारे तसेच मातोश्री रमाई महिला मंडळाच्या जयमाला रामटेके, वंदना चवरे, महानंदा वासनिक, इंदिरा दुधे, कुंजलता गेडाम, संगीता मंडे, सुनीता रामटेके, साधना इंगळे, पुष्पलता वसुकर, अनिता गवई, शीला तायडे, सुनंदा भोवते, सुजाता बडगे, ढोके ताई, कमला वासनिक, अंजली अडकणे, विद्या खंडारे, यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.