
अक्षर मानव संघटना व आझाद व्यवसाय सुविधा केंद्र तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम
अक्षर मानवचे राज्य संघटक आझाद खान आवर्जून उपस्थित
तिवसा / तालुका प्रतिनिधी
अक्षर मानव अमरावती जिल्ह्याचे कोषाध्यक्ष श्री अनील भाऊ मेंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अक्षर मानव जिल्हा कार्यकारिणी व आझाद व्यवसाय सुविधा केंद्र तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सुरवाडी खूर्द, ता. तिवसा, जिल्हा अमरावती येथिल शाळेत शुक्रवारी वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ आनंदाचा एक तास ‘ हा उपक्रम घेऊन सर्व मुलांना फळं वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दलवीर व्यास सर तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्षर मानव संघटनेचे महाराष्ट्राचे राज्य संघटक तथा विदर्भाचे पालकमंत्री श्री आझाद खान हे उपस्थित होते.अक्षर मानव ही संघटना साहित्य, समाज,कला ,शिक्षण, पर्यावरण, उद्योग,श्रम, विज्ञान, अश्या मानवी जगण्याच्या 96 विषयात राज्यभर काम करते.
आमची अक्षर मानव संघटना ही मानव हितासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.र्व भेदांच्या पलीकडे जाऊन कुटुंब आणि समाजाच्या भल्यासाठी आम्ही काम करतो. ईश्वर, जात, धर्म, पंथ, भ्रष्टाचार, भाषा असे, सारे भेद दुर करणे आणि माणूस निर्मळ, प्रामाणिक, नेक, सजग व्हावा या उद्देशाने आम्ही समाजासाठी काम करतो. ‘आनदाचा एक तास’ हा आमचा उपक्रम राज्यभर चालतो. शाळेत, घरी, लहान मुले जमतील तेथे उपक्रम आम्ही घेत राहतो. खास उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत काही आनंदाचे क्षण व्यतीत झाले पाहिजे. या उद्देशाने विविध उपक्रम सुरू राहतात एक ‘शनिवार एक चित्रकार’ निबंध स्पर्धा, लेखन कार्यशाळा, शुद्धलेखन स्पर्धा, वाचणं, लेखन गप्पा, गोष्टी, गाणी, खेळ, व्यायाम, सामुहिक नृत्य, असे उपक्रम आम्ही राबवत राहतो. सर्व वयोगटातील माणसांना ताण, तणाव, भीती,राग, द्वेष, भांडण, मारामाऱ्या, या सर्व गोष्टीं मधुन मुलं बाहेर आली पाहिजे. गावातील बालक, तरुण, प्रौढ, आणि वृद्ध यांना एकत्र आणून सामाजिक बंध मजबूत करणे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी असे समाजोपयोगी उपक्रम आवश्यक आहे. ही माहिती अक्षर मानवचे राज्य संघटक श्री आझाद खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.शाळेचे मुख्याध्यापक दलवीर व्यास सरांनी शाळे बद्दल संपूर्ण माहिती दिली या शाळेला जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत याची माहिती दिली. तसेच अनेक लोकांच्या सहकार्यामुळे या शाळेचा सुंदर परिसर बनवण्यासाठी आम्हाला मदत झाली. अक्षर मानवचे हे मानवीहिताचे उपक्रम या शाळेत सतत राबवत राहू लहान मुलांना संगित, नाटक,खेळ अक्षर मानव सारखी अनुभवी आंतरराष्ट्रीय संघटना आमच्या शाळे सोबत जुळत असेल तर आम्हाला आनंदच होईल. मुलं अधिक चांगले कशी घडतील तसेच सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग घेऊन गावातील एकता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवु अक्षर मानव खरोखरच कौतुकास्पद उपक्रम राबवत आहे. अनिल मेंढे सारखे पालक या समाजात तयार झाले पाहिजे. इतरही पालक यांच्या पासून प्रेरणा घेतील. आणि आमच्या शाळेत इतरही गावातील पालक उपक्रम घेतील या मुळे आमचाही उत्साह वाढतो. असे मुख्याध्यापक व्यास सरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रसंगी सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा घेत ही लहान मुलं माणूस म्हणून घडली पाहिजे. मुलांनी भविष्यात उंच भरारी घेत गरुड झेप घेतली पाहिजे. जीवनात शिस्त लागावी, नेतृत्व करण्यासाठी, जीवनात यश मिळवण्यासाठी विविध उपक्रम या शाळेत घेत राहू असे अक्षर मानवचे जिल्हा कोषाध्यक्ष अनिल मेंढे यांनी आपले मत मांडले. शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. संध्या जांबकर मॅडमनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरावती येथील स्पर्धा परीक्षा आयडियल अकॅडमीचे संचालक प्रा. शिवाजी कोकाटे तर आभार प्रदर्शन अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हा सचिव सौ. अश्विनी वितोडे- खान यांनी मानले. या आगळ्यावेगळ्या ‘आनंदाचा एक तास‘ उपक्रमा बाबत तिवसा-सुरवाडी वासियांना कौतुक वाटतं आहे.या उपक्रमासाठी अनिल मेंढे, शिवाजी कोकाटे, दलविर व्यास, सौ. संध्या जांबकर, सौ. संध्या मेंढे, कु. शुभांगी झटाळे, अश्विनी वितोंडे, सारिका कोकाटे सर्वानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.