
नांदगाव पेठ / प्रतिनिधी
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न पी.आर. पोटे पाटिल कृषी महाविद्यालय अमरावती येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंतीम वर्षातील विद्यार्थीनी श्रद्धा भाकरे, स्नेहा भिवकर, श्रुती उरकुडे , वैष्णवी कऱ्हे व श्रावणी रिठे द्वारे मौजे नांदगाव पेठ येथे दि. ०२/०८/२०२५ रोजी बोर्डो मिश्रणाच्या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले,
सदर प्रात्याक्षिका साठी नांदगाव पेठ येथील संत्रा बागायतदार शेतकरी अशोक राऊत ,सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर, अखिलेश शेंदरकर यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.सदर प्रात्याक्षिका दरम्यान बोर्डो मिश्रण तयार करण्याच्या प्रक्रियेचा योग्य क्रम व बोर्डो मिश्रण वापरताना घ्यावयाची काळजी तर बोर्डो मिश्रणाचे फळबागांवरील बुरशीजन्य रोगांपासून होणारे संरक्षण यासंदर्भात तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.चुना, मोरचुद आणि पाण्याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाला बोर्डो मिश्रण असे म्हणतात . संत्रा लिंबुवर्गीय फळझाडांचे बुरशीजन्य रोगांपासून रक्षण करण्याकरिता या मिश्रणाचा प्रभावी बुरशीनाशक म्हणून उपयोग होतो.वेगवेगळ्या तिव्रतेच्या बोर्डो मिश्रणाचा फवारणीकरिता, तसेच झाडाच्या बुंध्याला लावण्याकरिता वापर केला जात असतो.ग्रामीण कृषी कार्यानुभवाकरिता पी.आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल ठाकरे, उप.प्राचार्य निलेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. श्वेता देशमुख , वनस्पती रोगशास्त्राचे विशेषज्ञ प्रा. राहूल कळसकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. मदन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.