
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना 02.8.2025 रोजी मुख्य कार्यालय महावितरण अमरावती येथे माननीय श्री राजेंद्र पवार संचालक (मानव संसाधन) महावितरण मुंबई यांचा ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे (विद्युत विभाग) अध्यक्ष श्री विलास शिंदे, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे युनिट कार्याध्यक्ष रामकृष्ण चिखलकर दिव्यांग कर्मचारी संघटनेचे (विद्युत विभाग) झोनल अध्यक्ष श्री प्रशांत शिंदे श्री भूषण श्रीराव उपस्थित होते.
राजेंद्र पवार संचालक (मानव संसाधन) यांना दिव्यांगांच्या पदोन्नतीबाबतबाबत (30.06 2016 पासून दिव्यांगांची बिंदू नामावली सुधारित करावी व दिव्यांगांचा पदोन्नती मधील अनुश्वेष भरून काढावे) निवेदन देण्यात आले .