
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
शिलोडा पोस्ट मोखड ता. नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील रहिवासी शेतकरी श्री राजु भादुजी तिडके वय 38 वर्ष ह्या शेतकऱ्याने दिनांक 1 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी राहत्या घरात सकाळी 9:30 वाजता च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याला एक पत्नी शालू तिडके वय 35दोन मुली पूनम तिडके वय 17 सानिका तिडके वय 15 व एक मुलगा ऋतिक तिडके वय 13 असा छोटा अप्त परिवार आहे त्याचे तिन्ही मुले सध्या नाबालिक आहेत.
राजु तिडके यांच्या कडे गावात दोन ऐकर शेत असून त्यांनी कर्जमाफी ची प्रतीक्षा करत होते. राजु हे शेती व गावात मजुरी काम करत होते ह्या वर्षी सुध्धा त्यांनी काही ओडखीच्या लोकांन जवळून कर्ज काढून शेतात पेरणी केली होती. परंतु ह्या वर्षी शिलोड गावात आता पर्यंत पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यांच्या कडे पहाडी भागाचे लाल मातीचे शेत आहे त्या शेतीला पाण्याची जास्त गरज असते परंतु कमी पाऊस झाल्या मुळे त्यांनी निर्णय घेतला असेल असे गावातील नागरिक श्री प्रज्वल अरुण चौधरकर यांचे मत आहे.